Sunday, December 30, 2012

वाटतं कधी-कधी...


वाटतं कधी-कधी आपलही कुणी
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!

ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं....!

हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं....!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,

कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!

वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!!

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!!!

Thursday, December 27, 2012

Tujhi Bhet... तुझी भेट ...

तु भेटशील तेव्हा खुप काहि बोलायचे आहे थोडे फार भांडण आणि खुपसे प्रेम करायचे आहे, मनी साठवलेल्या क्षणांचा पदर उलगडायचा आहे प्रत्येक विरहाचा तुला जाब विचारायचा आहेँ, पण हे सारे ... तू भेटशील तेव्हा? सध्या तरी तुझी वाट बघणे हा एकच छंद जीवाला जडला आहे.....

Monday, December 3, 2012

Ek Kshan... एक क्षण...

Love is...
© Marathi Prem Kavita - Template by Blogger Sablonlari - Font by Fontspace